कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक
अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
शहर वाहतूक शाखेने – १०७ , इचलकरंजी शहर वाहतूक शाखा -७२, जुना राजवाडा -४, लक्ष्मीपुरी -७, शाहूपुरी -५, राजारामपुरी -७, करवीर -१७,कागल- ५,मुरगूड -२०, गांधीनगर -१०, गोकुळशिरगाव -१४,इस्पुर्ली -३, राधानगरी -२, हातकणंगले -६, भुदरगड -५६ , गडहिंग्लज – ११ अशा ३४६ एकूण केसेस नोंदवल्या आहेत.
बोरपाडळे येथे हॉटेल शिवप्रसाद धाब्याच्या पाठीमागील भिंतीलगत अवैधरित्या दारु विक्री करणारे अभिजीत पांडुरंग ठाणेकर, रा. झुलपेवाडी ता. आजरा (सध्या राहणार नावली ता. पन्हाळा) यांच्याकडे देशी टँगो पंच नावाच्या ३५ बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे आढळून आल्याने कोडोली पोलीस ठाणे येथे मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५(ख) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर कलम १८८ प्रमाणे पन्हाळा पोलीस ठाणे येथे १ व इचलकरंजी पोलीस ठोणे येथे १ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लागू करण्यात आदेशाचे जिल्ह्यातील नागरिकांनी उल्लंघन करु नये, होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.
लॉकडाऊनचा भंग करणाऱ्या ३४६ जणांवर गुन्हे दाखल : अभिनव देशमुख

Read Time:2 Minute, 6 Second