कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग व महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूरमध्ये F 360 पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. १ लाख ६६ हजारांची बक्षीसे असणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर , सांगली, सातारा, सोलापूर ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत. २७ फेब्रुवारीला गांधी मैदानावर सायंकाळी चार वाजता ही स्पर्धा आहे.
यावेळी बोलताना आयोजक आकाश कवडे म्हणाले, ही स्पर्धा सात गटांत होणार असून यामध्ये ५५ किलोगट, ५५ ते ६० , ६०-६५, ६५ -७०, ७०-७५, ७५-८०, आणि ८० किलोवरील समावेश आहे. प्रत्येक गटासाठी रुपये 3000./- , 2000/-, 1000/-, 500/-, 500/- अशी पाच बक्षिसे आहेत.
मेन्स फिजिक यातील विजेत्याला रुपये 10000/-,7000/-,5000/-3000/-1000/- अशी पाच बक्षिसे आहेत.मास्टर्स, हडीकँप ,गटासाठी रुपये 5000/-,4000/-,3000/-2000/-1000/-. मोस्ट इम्प्रुव आणि बेस्ट मुझिक पोझर गटांचा सुध्दा यामध्ये समावेश असणार आहे.
यातील विजेत्याला रुपये 5000/-. अशी पारितोषिके आहेत.
प्रतिष्ठेच्या Mr.F360 २०२३ ला रोख 51000/-. हजार रुपये बक्षिस आहे.
स्पर्धेसाठी १०० रुपये प्रवेश फी असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन आकाश कवडे यांच्या आई वडिलांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी पाच जिल्ह्यातून १५० ते १७५ खेळाडू अपेक्षित आहेत. स्पर्धेमध्ये स्थानिक आणि राष्ट्रिय पातळीवर खेळाडू सहभागी होणार आहेत.स्थानिक शरिरसौष्टवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याचे -आकाश कवडे यांनी सांगितले.
आकाश कवडे, उदय कवडे, इम्तियाज शेख, स्वप्नील उलपे, यशवंत पाटील, गौरव कदम, प्रफुल्ल हळदकर, रविराज चौगुले, राहुल परीट, विजय मोरे आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.