Share Now
Read Time:1 Minute, 15 Second
कोल्हापूर : जिल्ह्यातील कणेरी मठावर गेल्या काही दिवसांपासून पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. कणेरी मठ येथे मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. या गायींना कालचे शिळे अन्न खायला घातल्याने ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापूरातील कणेरी मठ गावा मध्ये ही घटना घडली आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. देशभर चर्चा सूरू असलेल्या या महोत्सवात ही घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात गायींवर उपचार सुरू आहेत.पुढील सविस्तर माहिती वैद्यकीय तपासानंतर समोर येईल.
Share Now