‘युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य’ च्या वतीने मदतीचा हात

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस व पोलीस कर्मचारी ,साफ सफाई आरोग्य अधिकारी व कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व लोकांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये किंवा तो विषाणू पसरू नये यासाठी संघाच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे तसेच वरील सर्व सेवा बजावणाऱ्या लोकांना सॅनेटायझर, मास्क, साबण व पाणी बॉटल देण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी ‘आपण काळजी करू नका दक्षता घ्या’ अशा कठीण काळामध्ये ”आम्ही सर्व एकत्र आहोत ”असे संदेश देत “माणुसकी हीच देश सेवा” या उक्तीप्रमाणे मदतीचा हात देत विशेषता बीड जिल्ह्यातील सय्यद अली, सांगली जिल्ह्यातील मीडिया कंट्रोल चे प्रतिनिधी संतोष कुरणे व शरद गाडे हे पुढाकार घेऊन उपक्रम राबवत आहेत त्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी त्यांचे कौतुक करत त्यांचे कार्य असेच सुरू ठेवण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *