Share Now
Read Time:1 Minute, 22 Second
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातलेले आहे. सांगलीतील कोरोनापीडित रूग्णांवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या रुग्णांची सेवा करणाऱ्या सांगली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील वार्ड बॉय कर्मचारी ,नर्सेस तसेच दवाखान्यात उपचार घेणारे आणि नर्सिंग स्कूल स्टाप यांच्यासाठी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा उपक्रम दानोळी चे दानशूर सुकुमार पाटील राबवत आहेत.
अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे ,डॉ.सुबोध उगाने, डॉ. भोई डॉक्टर दळवी , अधिकारी-कर्मचारी उपस्थितीत गेले पाच दिवस स्वतः सुकुमार पाटील टेम्पो घेऊन रोज भाजीपाला देत आहेत . याबद्दल शासकीय रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी सुकुमार पाटील यांच्या दानशूर वृत्तीचे कौतुक करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Share Now