Getting your Trinity Audio player ready...
|
लाईव्ह…..
शेवटच्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर यांचा ११०४० मतांनी विजय.
रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३१९४ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ६२२४४ मते मिळाली आहेत.
रविंद्र धंगेकर यांचा विजयी जवळपास निश्चित
अठराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ९०४९ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ६७९५३ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ५३९०४ मते मिळाली आहेत.
सतराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर १०३७१ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ६४३५८ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ५३९८७ मते मिळाली आहेत.
सोळाव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ६९५७ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ६०६५७ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ५३२३० मते मिळाली आहेत.
पंधराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ६००७ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ५६४९७ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ५०४९० मते मिळाली आहेत.
चौदाव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ५२८२ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ५२८३१ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ४७५४६ मते मिळाली आहेत.
तेराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ४९१२० मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ४४०३४ मते मिळाली आहेत.
बाराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ४८७७ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ४५६३८ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ४०७६१ मते मिळाली आहेत.
आकराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ३१२२ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ४११८८ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ३७९५५ मते मिळाली आहेत.
दाहव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ४२२७ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ३८२६३ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ३४०३६ मते मिळाली आहेत.
नवव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ४२५१ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ३४७७८ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ३०२७२ मते मिळाली आहेत.
आठव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर ३५०० मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण ३०५२७ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना २७१८७ मते मिळाली आहेत.
सातव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर १२७४ मतांनी आघाडीवर रविंद्र धंगेकर यांना एकूण २५९०४ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना २४६३३ मते मिळाली आहेत.
पाचव्या आणि सहाव्या फेरी आखेर महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर पुन्हा आघाडीवर आले आहेत. आतापर्यंत त्यांना एकूण १९६४५ मते मिळाली असून भाजप चे हेमंत रासने यांना १६४२३ मते मिळाली आहेत
चौथ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे एकूण ६०० मतांनी महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांचा पेक्षा आघाडीवर आहे. रासने यांना ३५०९ मते तर धंगेकर यांना ३१३० मते मिळाली आहे.
कसबा मतदार संघाच्या तिसऱ्या फेरीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे काही मतांनी आघाडीवर आहेत. तर रविंद्र धंगेकर जे पुढे होते ते आता पिछाडीवर गेले आहेत.
कसबा मतदार संघाची मत मोजणीची दुसरी फेरी सुरू असून रविंद्र धंगेकर यांना ८६३१ मते तर हेमंत रासने यांना ६९४६ मते मिळाली आहे. दुसऱ्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर १६६८ मतांनी आघाडी मिळवली आहे.
कसबा मतदार संघातून रविंद्र धंगेकर यांना ५८४४ तर हेमंत रासणे यांना २८६३ मते मिळाली आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना ३ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
अश्विनी जगताप यांनी या निवडणुकीत १ लाख मते मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
चिंचवड येथे ईव्हीएममशीन मधील मतमोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. यात भाजपच्या अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. नाना काटे हे पिछाडीवर आहेत. जगताप यांना ४ हजार मते मिळाली आहेत. तर काटे यांना ३ हजार ५०० मते मिळाली आहे. जगताप या ४०० मतांनी आघाडीवर आहे.
चिंचवड येथे पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाली असून तेथे समर्थकांनी निकालाआधीच भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयी कट आऊट लावले गेले असून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे.
कसबा मतदार संघाची पोस्टल मत मोजली जात असून यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे पिछाडीवर आहेत.
चिंचवड येथे सकाळी ८ वाजता पोस्टल मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. ही मोजणी पूर्ण झाली असून यात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली आहे.
पोस्टल मतदान मोजण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल दीड हजार नागरिकांनी या प्रकारे मतदान केले आहे. या साठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं आणि राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. सत्तांतर झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवरुन राज्याची पुढची गणितं ठरणार आहे.
मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी हेमंत रासने, रविंद्र धंगेकर यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे.
पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले होते. या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले.
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक राज्य भरात गाजली. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे अशा व्यक्तींखेरिज इतरांना या भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश असणार नाही. मतमोजणीच्या दिवशी अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.