आ.अनिकेत तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी निवड ही रायगडकरांसाठी अभिमानाची…

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 5 Second

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी 

कोल्हापूर : (रोहा-रायगड)महाराष्ट्र विधानपरिषदेतील विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी आ अनिकेत तटकरे यांची नियुक्ती झालेली असुन प्रत्येक राजकीय पक्षाचा एक व्हीप (प्रतोद) असतो. आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या व्हीपने करायचे असते. लोकसभेत किंवा विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मतदान व्हायचे असेल आणि संबंधित पक्षाने सरकारच्या बाजूने अथवा विरोधात मतदान करायचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबतचा आदेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो.

 अशा महत्वाच्या पदावर युवकांच्या मनावर आपल्या धडाकेबाज नेतृत्वाने अधिराज्य गाजवणार्या लाडक्या नेत्याची “मा.आमदार अनिकेत तटकरे साहेब” यांची नियुक्ती होणे हा रायगडकरांसाठी हा बहुमान समजला जात आहे.प्रतोद म्हणून नेमणूक देत त्यांच्यावर पक्षाने मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.यावेळी सरपंच सन्मा.हेमंत मालुसरे चेतन मालुसरे युवा कार्यकर्ता, यांच्यासह मालसई गावातील तरुणांनी अनिकेत भाईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सतीशजी भगत(माजी सरपंच वाशी ग्रामपंचायत),अरविंद मगर(उपसरपंच वाशी ग्रामपंचायत),महेश बामुगडे व समस्त रायगड जिल्ह्यातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते,युवा कार्यकर्ते,उपस्थित होत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *