मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीचा लाभ द्या : आमदार सतेज पाटील

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 23 Second

कोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शासनाच्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्याच्या प्राप्त अर्जांपैकी १०,१३६ इतक्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करणे बाकी आहे. यासाठीचा निधी वितरित करण्यात आला असून, शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

    विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे आमदार सतेज पाटील यानी या प्रश्नावर वेधले. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील १८ हजार ९०२ विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शासनाच्या राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे जानेवारी २०२३ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? या प्रकरणी शासनाने चौकशी करून याबाबत निधीची तरतूद शिष्यवृत्ती अदा करणेबाबत कोणती कार्यवाही केली, असे सवाल आमदार पाटील यानी केले. 

    यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. यामध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकाचा देखील समावेश आहे. या योजनेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एकूण ३,९१,१९८ इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३,८१,०६२ इतक्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, १०,१३६ इतक्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करणे बाकी आहे. त्यासाठी निधी वितरित करण्यात आला असून, शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *