देशाच्या सेवेसाठी तिने भरलेल्या डोळ्यांनी घेतला आपल्या बाळाचा निरोप…..!

विशेष वृत्त अजय शिंगे 

कोल्हापूर : आपल्या बाळाची जबाबदारी मोठी की देशाची सेवा यापैकी एका गोष्टीची निवड करने खरच एका आई साठी खूपच मोठे आवाहन असते. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव ता. करवीर येथील वर्षा पाटील-मगदूम या धाडसी महीलेने देशाच्या सेवेसाठी आपल्या १० महिन्याच्या बाळाला सोडून बॉर्डरवर देशाची सेवा करण्यासाठी जायचा निर्णय घेतला. आणि आजच्या पीढीसाठी एक आदर्श व्यक्ती ठरल्या.

Advertisements

  वयाच्या १९व्या वर्षी पाटलाची मुलगी इंडियन आर्मी भरती झाली. एवढ्या कमी वयात देशाच्या सेवेसाठी तयार होणे यांच्या कर्तबगारिने तरुण तरुणी समोर आदर्श निर्माण केला आहे.

VIDEO— https://youtube.com/shorts/e42AmoF2Xig?feature=share

 

दिल्ली मधील अनुभव सांगताना वर्षा पाटील म्हणाल्या होत्या की, ज्या दिवशी मी ही प्रात्यक्षिके सादर करत होते त्यावेळी संपूर्ण देश आपल्याला पाहत आहे, याची मनाला जाणीव झाली आणि मन भरून आले होते.खूप अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी, देशाच्या ध्वजाकडे पाहिले अन् लहानपणा पासूनचा सर्व प्रवास आठवला आई-वडिलांचे कष्ट आठवले भरती झाल्यानंतर गावापासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून माझ्यावर झालेला कौतुकांचा वर्षाव आठवला. वर्षा पाटील या एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वडील शेतकरी तर आई गृहिणी.त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. बारावीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूर शहरातील एस एम लोहिया कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.आणि शिक्षण सुरू असतानाच तुमची सैन्यात भरती झाली. वर्षा पाटील यांची पहिली पोस्टींग राजस्थान येथे झाली.२०१४ मध्ये त्या सीमा सुरक्षा बलमध्ये भरती झाल्या. प्रशिक्षणाचा कालावधी संपून त्या गुजरातच्या भूज सीमेवर जॉईन झाल्या. सहा महिने सीमेवर तैनात आणि सहा महिने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेडची तयारी असे त्यांचे सेवेचे वेळापत्रक होते.

२०१९ मध्ये दऱ्याचे वडगाव येथील रमेश मगदूम यांच्याशी वर्षाचे लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी वर्षा पाटील- मगदूम यांना मातृत्वाची चाहूल लागली.२०२२ च्या मे महिन्यात त्यांनी एका मुलाला जन्म दिला .मुलाच्या जन्मानंतर त्या मातृत्वाच्या सुखाने आनंदात गेल्या. मात्र त्याचवेळी देश सेवेसाठी बाळापासून दूर राहावे लागणार ही भावनाही दाटून येत होत्या .

त्यामुळे प्रसूतीसाठी मिळालेल्या रजेतून सर्व क्षण त्यांनी मनापासून आपल्या मुला बरोबर आनंदाने घालवले. सुट्टी संपून त्यांना आता पुन्हा देशाच्या सेवेसाठी जावं लागले. यावेळी बाळाचा निरोप घेताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कुटुंबातील लोकांपासून दूर जाणे आणि आपल्या दहा वर्षाच्या बाळा पासून दूर जाणे याचे दुःख त्यांना खूपच होते.पण देशाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या या त्यागाची पूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पूर्ण जिल्हातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *