Share Now
कोल्हापूर : संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ मगरमठीतर्फे १४ ते २२ मार्च श्री स्वामी समर्थांचा पालखी सोहळा व २३ मार्चला प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून मगरमठी येथे स्वामी प्रगट दिनाचे आयोजन केले जाते. यासाठी १४ मार्चपासून दररोज श्रीस्वामींची विविध रूपातील पूजा, सहस्र नामावली, भजने, लघुरुद्र, अभिषेक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ता. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मिरजकर तिकटी येथून पालखीचे प्रस्थान होईल. गुरुवार, २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मगरमठी संभाजीनगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहनही भाविकांनी केले आहे. दरम्यान, आज उत्सवाच्या पहिल्या दिवशी वामन रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा संदीप खोत व अभिजित सूर्यवंशी यांनी बांधली
Share Now