भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे गायत्री घुगे या महीला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 28 Second

मुंबई : भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. गायत्री सरला दिनेश घुगे यांचा जेष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तसेच यावेळी लेखक मंगेश मसुरकर संग्रहित जेष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोपचे प्रकाशन देखील करण्यात आले.

काल दि.१६ मार्च २०२३ रोजी मुंबईतील दहिसर पुर्व मधील विठ्ठल मंदिरातील स्वामी माधवेंद्र सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. दत्ताराम घुगे यांच्या सौभाग्यवती स्व.माधुरी दत्ताराम घुगे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गायत्री घुगे यांच्या सह समाजातील १८ अनेक महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गायत्री घुगे या गेल्या चार वर्षांपासून पत्रकार क्षेत्रात काम करतं आहेत. खूप कमी वयात त्यांनी या क्षेत्रात काम करुन नावलौकिक मिळवला आहे. आपल्या लेखणीने आणि कौशल्याने गायत्री घुगे यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महिलांचे विषय असतील अथवा सामाजिक आपल्या लेखणीतून त्यांनी अगदी प्रखरतेने मांडणी केली आहे. अनेक सेलेब्रिटी व्यक्तींच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला गेला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *