रोहा तालुक्यात शिंदेशाहिचा प्रभाव वाढतोय,ठिक-ठिकाणी विकास कामांचा नारळ फुटतोय….!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 8 Second

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत  

रोहा-रायगड :  काही महिण्यांपुर्वीच महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक राजकिय घडामोडी वेगाने घडत गेल्या.रोहा तालुक्यात देखील अशाच घडामोडी घडत असताना रोहा तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिक अॅड.मनोजकुमार शिंदे यांच्यावर देताच.आपल्या धडकेबाज कार्यशैलीतुन असंख्य नेते,कार्यकर्ते शिंदे छताखाली आणुन रोहा तालुक्यातील आपली राजकिय पकड मजबुत करताना दिसत आहेत.याचाच भाग म्हणून काहि दिवसापुर्वीच रोहा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रिय आमदार.महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करवून घेतला.

            “निर्णय वेगवान,सरकार गतिमान”शिंदे सरकार हे केवळ आश्वासन देणार सरकार नसून आश्वासन पूर्ण करणार सरकार आहे हे पुन्हा एकदा दिसून आल.कारण दिनांक १६/०३/२३ रोजी रोहा तालुक्यातील खंदार गाव येथे २२/२३ डोंगरी विकासातंर्गत सात लाखाचा निधी आ.महेंद्र दळवी साहेबांनी मंजूर केला.नुकताच हनुमान मंदिर भुमिपुजन सोहळा लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांच्या अध्यक्षते खाली हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उपस्थित उद्देश जी वाडकर साहेब(शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख),सुधाकर शिंदे साहेब (मा. सरपंच आरे बुद्रुक व जेष्ठ नेते व सल्लागार शिवसेना),यांनी बोलताना “राज्यात जस शिंदे सरकार आहे, तसच आगामी काळात रोहा तालुक्यात देखील आ.महेंद्र दळवी मार्गदर्शनाखाली आणि मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकार आणु” असा विश्वास व्यक्त केला.

   यावेळि या सोहळ्यासाठी उपस्थित मोतीराम गिजे -जेष्ठ नेते शिवसेना,रमेश धनावडे,-जेष्ठ नेते,मंगेश रावकर-रोहा शहरप्रमुख, गहिनीनाथ कटोरे-खजिनदार, शैलेश सकपाळ-उपविभाग प्रमुख चनेरा,भालचंद्र मोरे-सहसंपर्क प्रमुख चनेरा विभाग,समीर घोसाळकर विभागप्रमुख घोसाळे,मयुर सुधाकर शिंदे -युवाधिकारी चनेरा विभाग, गमेश विनोद दळवी-शाखाप्रमुख आरे बुद्रुक व युवा नेता तसेच मा. सौ.अमृता रमेश धनावडे-महिला संघटिका प्रमुख, सौ.मेघ महादेव सावंत- महिला उपसंघटिका प्रमुख, सौ.सानिका करंजे-विभागप्रमुख मेढा, इत्यादी प्रमुख पाहुणे व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंत बोले,उपाध्यक्ष- श्री.लक्ष्मण कुळे, श्री.जनार्धन कुळे, सचिव श्री.उदय साळवी, व खंदार गावचे डॅशिंग शाखाप्रमुख श्री.मनोहर बोले व शिवसेना पदाधिकारी व खंदार ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *