Share Now
Read Time:58 Second
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अडसूळ मळा परिसरात राहणाऱ्या संगीता भारत खंडागळे ( वय ३५) या स्क्रॅप व्यावसायिक महिलेने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबतची वर्दी तिचे नातेवाईक संजय प्रकाश कोळी (रा.गांधीनगर) यांनी दिली.
लॉकडाऊन झाल्यापासून तिचा स्क्रॅप व्यवसाय बंद असल्याने ती आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. याबाबतची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे,
अधिक तपास हवालदार व्ही. आर. डांगे करत आहेत.
Share Now