Getting your Trinity Audio player ready...
|
मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊनमुळं सर्व उद्योगधंदे आणि व्यवहार बंद आहेत. त्याचा फटका हातावरचं पोट असणार्या अनेक कष्टकरी, श्रमजीवी कुटूंबाना बसलाय. विशेषत: भटक्याल समाजातील कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय. ही बाब लक्षात घेवून, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं, गोरगरीब ५०० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचं वाटप करण्यात येतंय.
युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी लमाणी, नंदिवाले आणि फिरते विक्रेत्यांच्या कुटूंबांना मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटूंब गरजूंना भोजन आणि जीवनावश्यक वस्तुंचं कीट बनवण्यासाठी कार्यरत आहे.
देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यामुळं सर्वच उद्योगधंदे आणि व्यवहार बंद आहेत. त्यामुळं हातावरचं पोट असलेल्या कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय. अशा गोरगरीब कुटूंबांना मदत करण्यासाठी धनंजय महाडिक युवाशक्ती, भागीरथी महिला संस्था पुढं सरसावलीय. माजी खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक हे दररोज सुमारे ५०० कीट बनवत आहेत. या कीट मध्ये तांदुळ, आटा, चहा पावडर, मीठ-साखर, खाद्य तेल अशा वस्तुंचा समावेश आहे. युवाशक्तीच्या वतीनं मंगळवारी अशा गोरगरीब आणि गरजू कुटूंबांना या कीटचं वाटप करण्यात आलं. लमाणी, नंदीवाले कुटूंबीय आणि भटक्या समाजातील कष्टकर्यांना, अन्नधान्याचं कीट वितरीत करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केदार जोशी, सुनील वानकर, अशोक लाखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे जीवनावश्यक साहित्य वितरीत केलं. कोल्हापुरातील उचगांव पुर्व भागात राजीव गांधी वसाहत आणि लोणार वसाहतीमधील कुटुंबांना या जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करण्यात आलं. महाडिक कुटूंबिय आणि युवाशक्तीच्या वतीनं प्रत्येक आपत्तीच्या वेळी मदत कायर् करण्यात येतं. गोरगरीब, कष्टकरी भटक्या समाजाची उपासमार होवू नये, यासाठी हा उपक्रम राबवल्याचं माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. गरजूंना चपाती-भाजीचं पॅकेट आणि दररोज ५०० कुटूंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं कीट मिळत असल्यानं, कष्टकरी वर्गातून धनंजय महाडिक युवाशक्तीच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.