सन्माननीय नगरसेवक यांनी आपल्या भागात केेली स्वच्छता मोहीम व औषध फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : प्रभाग क्रमांक ७९ , सुर्वे नगर येथील नगरसेविका मेघा आशिष पाटील यांनी आज आपल्या प्रभागात औषध फवारणी केली तर नगरसेविका सुरेखा शहा यांनी प्रभाग क्रमांक २० मधील लोणार वसाहत व लोहार मळा येथे औषध फवारणी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी  यांनी सर्व नगरसेवकांना बैठक घेऊन आपल्या आपल्या  प्रभागांमध्ये कोरोना पादुर्भाव पसरू नये ,या संदर्भात सखोल दक्षता घेण्याची सूचना केली होती व आरोग्य अधिकाऱ्यांना घेऊन आपापल्या प्रभागांमध्ये मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सन्माननीय नगरसेवक यांनी आपल्या आपल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम व औषध फवारणी मोहीम राबवली.

  प्रभाग क्रमांक ट्रेझरी ऑफिस चे मेहरूनबी रियाज सुभेदार, व त्यांचे पती राजू उर्फ रियाज सुभेदार व प्रभाग क्रमांक व्हीनस कॉर्नर चे नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण यांनी विशेष आपल्या प्रभागांमध्ये लक्ष घालून स्वतः हातामध्ये फवारणीचे पाईप घेऊन औषध फवारणी केली.
तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व भागातील नागरिक यांच्यातर्फे प्रभागात नागरिकांना कोणीही घरा बाहेर पडू नये घरातच राहून दक्षता घ्यावी .
महानगरपालिकाला व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करत ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत ‘ असे धीर देत सांगून विनंती केली यांच्या समवेत महानगरपालिकेचे महानगर पालिका कर्मचारी, व भागातील अमर देसाई, पिंटू उर्फ विजय देसाई, फिरोज मुजावर, संजय परब, साफ सफाई कर्मचारी आणि रफिक मुजावर सहभाग घेतला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *