कशासाठी तर हक्कासाठी

प्रति
उद्धवजी ठाकरे सो….
मा.ना मुख्यमंत्री
मंत्रालय मुंबई ३२ महाराष्ट्र राज्य
प्रति
मा. डॉ.दिलीप पांढरपट्टे
महासंचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन
तळमजला मंत्रालय मुंबई ३२
प्रति
मा. दौलत देसाई सो…
जिल्हा अधिकारी कोल्हापूर
प्रति
मा. प्रशांत सातपुते सो…
कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर
सविनय, जय महाराष्ट्र..

विषय:- पत्रकार बधंवाना आर्थिक मदत मिळणे बाबत….

Advertisements

राज्यात कोरोना सारख्या महा विषाणूचा फैलाव जोरात सुरू आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यु व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून,
वृत्तपत्र प्रसार माध्यम ही अत्यावश्यक सेवा असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे
कठीण गंभीर परिस्थिती प्रसारमाध्यमच व त्यांचे प्रतिनिधी प्रबोधनाची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतील असा गाढ विश्वास असल्यानेच, केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असावा.
त्याचा परिणाम पत्रकार बाधवांवरती खूप होत आहे. रोजचा दैनंदिन खर्च, शिक्षणखर्च, आजारपण, कर्जाचे हफ्ते, सामान्य पत्रकार छायाचित्रकार हा आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाचा आरसा बनून समाजाची खरी परिस्थिती दाखवत आहे शासनाची थेट सामान्य नागरिकांच्या पर्यंत माहिती व संपर्क घडवून आणत आहे, परंतु पत्रकार बंधवावांचे कुटुंबाचा गाडा ओढणे सध्या कठीन होत आहे त्यात २५ दिवस काम बंद जीवन मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांचे जगणे मुश्किल होत आहे तरी सरकारने आम्हा महाराष्ट्रातील सर्व (ज्येष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार,छायाचित्रकार,कॅमेरा मेन, वार्ताहर डीटीपी ऑपरेटर, ग्राफिक्स, न्यूज पोर्टल, वेब न्यूज, संपादक/ पत्रकार,पेपर विक्रिते बांधवांना आर्थिक सहाय्य करावे. शासन सर्व स्तरांतील समाजाला,शासकीय ,निमशासकीव ,खाजगी कंपनीतील कर्मचारी नोकरवर्ग बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गास मदत जाहीर होत आहे, तर पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकार बांधवांवरती अन्याय नको त्यांनाही आर्थिक सहाय्य मिळणेस ही सरकारला कळकळीची विनंती आहे.
जरूर तो आमचा विचार व्हावा.
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य
तर्फे महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडे लॉक डाऊन व कर्फ्यू असल्याने प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात येईल.
आम्हा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पूर्णपणे विश्वास आहे की मदत नक्की मिळेल

कळावे
( युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य)
महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनींना आवाहन आहे की ह्या उपक्रमात सहभागी व्हा!

कशासाठी तर हक्कासाठी✊
संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे
७८ ७५ ७० ७७ ७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *