बेघर व पर राज्यातील अडकलेले मजूर यांचेसाठी दानशूर वक्ती, संस्था आणि उद्योजक यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन : को. म. न. पा.

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 18 Second

मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजवलेले /शिजविण्यासाठी तयार अन्नाचे पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका हद्दीतील बेघरासाठी महानगरपालिकेने शिरोली जकात नाका, शाहू जकात नाका, जेम्सस्टोन इमारत एस.टी.स्टॅन्ड व रिलायन्स मॉल पिछाडीस या चार ठिकाणी निवासाची व भोजणाची व्यवस्था चालू करण्यात आलेली आहे. त्याव्यतिरिक्त या कालावधी मध्ये अशा अडकलेल्या लोकांसाठी महापालिकेने शेठ रुईया विद्यालय, सुभाष रोड व रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत रोड या दोन ठिकाणी तात्पुरते निवारे सुरु केलेले आहेत. सदरचेे निवारे अपूरे पडल्यास जादा निवाऱ्याची सोयही करण्यात केलेली आहे.
तसेच कोल्हापूर शहरामध्ये इमारतीचे बांधकाम विकसकामार्फत सुरु आहेत अशा सर्व ठिकाणी संबंधीत विकसकानी तेथे काम करणाऱ्या मजूरांची राहणेची व अन्नपाण्याची व औषधपाण्याची सोय करुन सुमारे 1000 हजार मजूरांना स्थंलातरीत होणेपासून रोखणेस मदत केलेली आहे. शहरात दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे मजूर, ठेकेदाराकडे रस्त्याचे काम करणारे मजूर, विट्टभट्टी वरील मजूर, गोसावी समाजा मधील, नंदीबैल फिरवणारी लोक असे जवळ जवळ 1000 मजूर/लोक तात्पूरते निवारे करुन वेगवेगळया 10 ते 15 ठिकाणी राहीलेले आहेत. अशा लोकांच्या मदतीसाठी महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नियंत्रण समिती स्थापन केलेली आहे. त्यासमिती मध्ये अतिरिक्त आयुक्त, नितीन देसाई, सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार व उपशहर रचनाकार एन.एस.पाटील हे समनवयक म्हणून काम पहात आहेत. तसेच जिवनमुक्ती संघटनेचे अशोक रोकडे, अवणी संस्था, केडीएमजी ग्रुप, एनयूएलएमचे अधिकारी रोहित सोनुले इत्यादीची समितीचे सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे. या कामासाठी व्हाईट आर्मी, अवणी, क्रिडाई, केडीएमजी ग्रुप अशा अनेक संस्था मदतीसाठी कार्यरत असून यशस्वीपणे काम करित आहेत. तथापि शहरामध्ये असलेले मजूरांची संख्या व मिळत असणाऱ्या अन्नधान्याची मदत अपूरी पडत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती व संस्था, उद्योजक यांनी या लोकांसाठी सढळ हाताने मदत करावी असे कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आवाहन करणेत आलेले आहे. अशा कोणाला मदत करावयाची असल्यास इच्छूकांनी सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, (मो.नं.9766532010) व उपशहर रचनाकार एन.एस.भोसले (मो.नं.9342717111) व एन.एस.पाटील (मो.नं.7709042171) यांचेशी संपर्क साधणेत यावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *