गडमुडशिंगीत ग्रामपंचायत सदस्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी देशभर लॉक डाऊन सुरू असल्यामुळे ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत, अश्विनी जितेंद्र यशवंत व त्यांच्या परिवाराकडून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे प्रापंचिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
जितेंद्र तानाजी यशवंत व अश्विनी जितेंद्र यशवंत यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने ग्रामस्थ माता-भगिनींना जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या. व अनाथ, निराधार आणि बेघर लोकांनाही मदत करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आप-आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांना नाश्ता व चहा पाण्याची सोय केली. संजय सोनुले, लखन इंगळे, शरद लोखंडे, अर्जुन लोखंडे, किरण सोनुले, राजेंद्र सकटे, ऋतिक सकटे, मंदार यशवंत, महेश सकटे, शैलेश सकटे, सुहास इंगळे, वैभव घाटगे, साताप्पा माने, महेश सोनुले, निवास सकटे, प्रवीण लोखंडे यांनी घरोघरी जाऊन साहित्याची वाटप केले व महामार्गावरील लोकांना नाश्ता व चहापाण्याची सोय केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *