२० मार्च ‘जागतिक चिमणी दिवस’ जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा आजचा दिवस. पहिला जागतिक चिमणी दिन २०१० मध्ये जगाच्या विविध भागात साजरा करण्यात आला. परंतु आजच्या काळात मुलांना फोटोतच चिमण्या दाखवाव्या लागतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या शतकात सतत कमी होणारी पक्षी संख्या आणि विलुप्तीच्या मार्गांवरील अचानक गायब झालेली चिमणी या विषयी जनजागृती करण्यासाठी गेल्या १४ वर्षा पासून २० मार्च ला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो.
चिमण्यांची संख्या घटण्याचे अनेक कारण परंपरागत ज्ञानाच्या आधारावर सांगण्यात येतात जसे कि कमी होणारे जंगल तसेंच वेगाने वाढणारे शहरीकरण,मोबाईल टॉवर त्यातील रेडि्येशन, ध्वनी प्रदूषण, लाईट प्रदूषण, इत्यादी.पक्षी संशोधक खंत व्यक्त करतात कि चिमणी संपत आहे हे दर्शवण्यासाठी चुकुचे निरीक्षण नोंदवले गेले.जसे कि चिमण्याच्या संख्ये विषयी बोलायचे झालेच तर खूप चुकीचे निरीक्षण किंवा अधुरे निरीक्षण नोंदवले गेले आहेत उदा. लखनउ मध्ये २०१५ च्या पक्षी गणनेत ५६९२ चिमण्याची नोंद घेण्यात आली आणि ७७५ चिमणी थवे विविध ठिकाणी नोंदणी गेली,२०१७ मध्ये तिरुअनंतपुरम येथे फक्त २८ चिमण्या ९ नोंदवल्यात, चिमण्यांची संख्या आंध्र प्रदेश मध्ये ८० % तसेच २० % राजस्थान, गुजरात, केरळ येथे कमी झाली आहे.ही आकडेवारी भारतीय कृषी संशोधन परिषदने नोंदवली आहे.लाखो जीवित प्रजाती मधील मानव ही एक प्रजाती आहे,विधात्याच्या या जीवनसृष्टी मध्ये माणूस मालक बनू पाहत आहे.काही लोकांची पाशवीप्रवृत्ती निसर्गात जे आहे ते माझ्या प्रयत्नमुळे आहे हे दर्शवाण्यात सार्थकता मानतात. निसर्गातील उत्कृष्ट अभियंता चिमणी आहे जी घरटे कुठल्याही शैक्षणिक पात्रते शिवाय नितांत स्वर्गीय या स्वरूपाचे घरटे बांधते पण काही लोकांना, पक्षांच्या जीवन जगण्याच्या क्षमते वर शंका आहे, त्यामुळेच मानव निर्मित घरटे लावण्याची सुरुवात झाली आहे.
जागतिक स्तरावर पक्षी जगत पुर्ण पणे बदलले आहे, शेकडो वर्ष पूर्वीची नैसर्गिक जीवनशैली वर आधारित पक्षी संवर्धन भारतात होत आहे, त्यामुळे पक्षी जगतातील झालेल्या बदला विषयी अभ्यास न करता पारंपरिक पद्धतीने पक्षी संवर्धन सुरु आहे आणि त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडतं आहे.पूर्वीच्या काळी असलेल्या जुन्या घरांमध्ये कौलारु घरांमुळे चिमणीला आपले घरटे बांधण्यासाठी जागा असायची, ती अगदी सहज माणसाच्या घरात ये-जा करु शकत असे. मात्र आता चकचकीत घरांमध्ये, खिडक्यांमधून चिमणीला घरात येण्यासाठी असणारा रस्ता हरवला गेला आहे.
चिमणी संवर्धनासाठी काय करावे….
उन्हाचे प्रमाण वाढल्याने यांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे. पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे. आता बागेतील चिमणी गायब होण्यासाठी वाचवायची असेल तर आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी चिऊ वाचवू अभियान राबवू या असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.