शिवशंभो प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडे अनेक तरूणांचा कल वाढतोय,हीच आमच्या कार्याची खरी पोहच पावती आहे.-सुशांत भोकटे…!

रोहा प्रतिनिधी अमर पवार 

रोहा  :-सध्याची राजकिय परिस्थिती पाहता बर्याच तरूणांचा राजकारणातील आकर्षण कमी झालेला दिसतोय.राजकिय काम करण्यापेक्षा अनेक तरूणांचा कल हा राजकारण-विरहित सामाजिक कार्याकडे वाढताना दिसतोय.असच काहीस चित्र रोहा तालुक्यातील धाटाव विभागात पहायला मिळाल.गेली कित्येक वर्षे “शिवशंभो प्रतिष्ठानच्या” माध्यामतुन सामाजिक कार्य करणारी युवकांची फळी “शिवशंभो प्रतिष्ठाचे अध्यक्ष सुशांतजी भोकटे” यांच्यापाठीशी उभी राहताना दिसत आहे.

Advertisements

  अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या रोहा धाटाव येथील “शिवशंभू प्रतिष्ठान सामाजिक संस्थेने” रोहा तालुक्यात समाजिक कामाचा धडाका लावला आहे.शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत भोकटे यांनी मोजक्या दिवसात आपल्या दमदार कार्यशैलीतुन नावलौकीक मिळवलं असून तरूणांना आदर्श वाटेल असे काम केले आहे.त्यांच्या कामाने प्रेरीत होऊन,त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी श्रीशिवशंभू प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेत अनेक तरुण सहभागी होत आहेत. कालच श्रीशिवशंभू प्रतिष्ठान धाटाव विभाग व रोठ बू.विभाग येथील अनेक तरूण शिवशंभो प्रतिष्ठान सामाजिक संस्थेत सभासाद झाले.यावेळी धाटाव येथील सागर जाधव,अंकेत खैरे,दिपक भोकटे,राज रटाटे,रंदिप शर्मा,प्रतिश भोकटे.निखिल ताम्हणकर तसेच रोठ बु.येथील अरुण साळुंखे,सुनिल थिटे,शदिपेश बांधल,सुरज साळुंखे,उमेश डोलकर,निलेश म्हसकर,जनार्दन साळुंखे,नितेश कोल्हटकर,मयुर कळंबे यावेळि उपस्थित सदस्य व पदाधिकारी यांना शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत भोकटे यांनी पद वाटप करून पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *