युवा पत्रकार संघ रोहा तालुका “अध्यक्षपदी अमर पवार” आणि “सचिवपदी अनिल खंडागळे” यांची नियुक्ती…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी 

रोहा-प्रतिनीधी : रोहा तालुक्यात समाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण,आपल्या सामाजिक कार्यातून अनेक सामान्य लोकांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असणारे “अमर पवार आणि अनिल खंडागळे” यांची नुकतीच “युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य-संस्थापक तथा अध्यक्ष शिवाजी शिंगे” यांच्या सुचनेनुसार “रायगड जिल्हा अध्यक्ष दिपक भगत” यांच्यावतीने रोहा तालुका अध्यक्षपदी आणि रोहा तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

           यावेळी “संस्थापक अध्यक्ष युवा पत्रकार संघ महाराष्ट्र-राज्य शिवाजी शिंगे यांनी” नवनिर्वाचीत सदस्य अमर पवार आणि अनिल खंडागळे यांना शुभेच्छा दिल्या.तसेच अनिल खंडागळे आणि अमर पवार यांना मी सुरूवाती पासूनच ओळखतो त्यांच्या कामाचा ओघ आणि सर्वसामान्यां प्रती असलेली तळमळ मी जवळून पाहिलेली आहे.येत्या काळात अमर आणि अनिल युवा पत्रकारितेच्या व्यासपीठाचा योग्य तो वापर करुन आपल्या पदाला योग्य तो न्याय देतील आणि सर्वसामान्यांची बाजू मांडून आपल्या पत्रकारीतेतुन वाचा फोडतील असा विश्वास युवा पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपक भगत यांनी व्यक्त केला.रोहा तालुक्यासह महाराष्ट्रातील समस्त युवा पत्रकार संघाकडुन अभिनंदन करुन.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *