राम नवमीनिमित्त पाली-सुधागडसह रायगडमध्ये अनेक ठिकाणी उत्साहाच वातावरण….

अमर पवार रोहा प्रतीनीधी 

रोहा :- चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.राम नवमी म्हटल्यानंतर देशात अनेक ठिकाणी उत्साहाचा आणि आनंदाच वातावरण असत.

Advertisements

        पाली_सुधागड तालुक्यातील रामवाडी गावात रामनवमी उत्सवदेखील मोठ्या उत्साहाने साजरा करतात.दरवर्षी श्रीराम जन्मोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास गुढीपाडव्यापासूनच सुरवात झाली आहे.उत्सवाला पंचक्रोशीतील बाहेर गावी गेलेले चाकरमानी, माहेरवाशीण यांची गर्दी पाहायला मिळते.रामनवमी उत्सवामुळे पंचक्रोशीत उत्सवाचे वातावरण आहे.या सोहळ्यास भाविक, ग्रामस्थ, नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन रामवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.२२ ते २९ मार्च दरम्यान श्रीरामविजय या ग्रंथाचे वाचन सुरू आहे.तसेच हरिपाठ, भजन, कीर्तन, पालखी, मिरवणूक अशा कार्यक्रमामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे, तरी या कार्यक्रमास सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन रामवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *