राम नवमी निमित्त रोहा धाटाव पंचक्रोशीतील तळाघर येथील महादेव मंदीर यात्रेला यात्रेकरुंची अलोट गर्दी….!

रोहा प्रतिनिधी अमर पवार…

रोहा : रोहा तालुक्यातील तळाघर येथे श्री स्वयंभू महादेव मंदिर आहे.गेली कित्येक वर्षे यात्रेचा उत्सव मोठ्या दिमाखात आणि नियोजनबद्धतेत साजरा केला जातो.येथे अष्टमीला देवाचं लग्न पूर्ण विधीसह लावले जाते.लग्नासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आपल्या बांबूच्या काटिला करवल्या प्रमाणे सजवून आणतात. त्या दिमाखदार काट्या डौलाने सजवून नाचवत आणल्या जातात.महादेव वाडी येथील भगत देवाची वर्षभर पुजा करतात आणि लग्नाच्या दिवशी त्यांनाही मान दिला जातो.धाटाव,तळाघर,वाशी, महादेव वाडी,लांढर,निवी,रोठ,उडदवणे,मळखंडवाडी,बोरघर,बारसोळी, किल्ला अशा अनेक गावांचा या उत्सवात मोलाचं योगदान असते तर त्यांना योग्य तो मान दिला जातो.तळाघर हे गाव यजमान असल्याने त्यांच खुप योगदान असते.कोळी बांधवांना सुध्दा योग्य तो मान देऊन त्यांचं पाहूनचार केला जातो.रोहा तालुक्यातील भक्तांची यात्रेला अलोट गर्दी होते.यात्रेला कुणबी,आगरी, कोळी, कुंभार, मराठी सर्व धर्मांचे लोक एकत्र येऊन सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवुन आदर्श वाटावं असं सहकार्य करतात. 

Advertisements

          तळाघर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच वाशी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच हे सर्व दुकानदार, यात्रेकरू यांची सोय करण्यात तत्पर असतात.तळाघर येथील महादेव मंदिर देवस्थान हे स्वयंभू असून येथे एरवी सुध्दा भक्तांची रहदारी असते.यात्रेला देवाचं लग्न लावण्यासाठी, तसेच दुसऱ्या दिवशी देवाचं दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळते.यात्रा दुकान,आकाशपाळणे, लहान मुलांचे खेळणी,गाडी,घोडा, मोठ्या मोठ्या दुकानांनी बहरली आहे,तरी सर्व भक्तांनी या यात्रेस येऊन श्री स्वयंभू महादेवाचं दर्शन घ्यावं असे यात्रा कमिटी कडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *