मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते बिग डिप्पर इन्शुरन्सचे उद्घाटन….!

कोल्हापूर : देशवासीयांचा एक धन्यवाद जवानासांठी खूप महत्त्वाचा असतो. कारण याच पाठबळावर तो देशासाठी हसत हसत बलिदान देतो, असे प्रतिपादन कारगिल योद्धा कॅप्टन योगेंद्रसिंह यादव यांनी आज केले.

शाहू स्मारक भवन येथे बिग डिप्पर इन्शुरन्स ब्रोकर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Advertisements

मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, इन्शुरन्स आज काळाची गरज आहे. तशीच जिद्द महत्त्वाची आहे. परिस्थिती युवा पिढी बदलू शकते.

युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे माजी व्यवस्थापक विजय पवार म्हणाले, आज इन्शुरन्स क्षेत्रामध्ये उच्च पदावर मराठी युवकांची संख्या कमी आहे. त्यादृष्टीने पालकांनी, युवकांनी मनोवृत्ती बदलली पाहिजे. यामध्ये त्याला संधी मिळाली तर तो संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.   

कंपनीचे अध्यक्ष रणजितसिंह पुं. पाटील यांनी प्रास्ताविकात कंपनीविषयी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, ज्याप्रमाणे सप्तर्षी होकायंत्राचे काम करते आणि उत्तर दिशा दर्शविते त्याप्रमाणे आमची बिग डिप्पर कंपनी विमा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करेल. बिग डिप्पर म्हणजेच सप्तर्षी. मी या क्षेत्रात गेल्या २० वर्षांपासून आहे. यामध्ये फेलोशिप मिळालेली आहे. त्या दृष्टीने रि-इन्शुरन्स व्यवस्थापक म्हणून मी काम पाहतो. इतक्या मोठ्या अनुभवानंतर येथे कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीच्या वतीने वैयक्तिक, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्राला सेवा देण्यात येईल. यात साधारण विमामध्ये आग, चोरी, इंजिनिअरिंग, वाहन, आरोग्य, न्यायालयातील दावे (लायबिलिटी), तेल विहिरी, विमान, जहाज आणि जहाजावरील मालवाहतूक अशा संबंधित घटकांना कंपनी सेवा देईल. व्ही. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी डायरेक्टर अँड प्रिन्सिपल ऑफिसर अमित जाधव, तृप्ती पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कारगिलचे अनुभव

कारगिल युद्धात १७ गोळ्या लागलेले श्री. यादव यांनी टायगर हिल पुन्हा मिळविण्यासाठी प्रत्यक्षात काय घडले, याविषयी सभागृहात कथन करताना देशभक्तीचा माहौल सर्वांनी अनुभवला…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *