पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे बदनामीकारक पोस्टर लावणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून कारवाई करा : राहूल चिकोडे…..!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 29 Second

कोल्हापूर : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर विचारांची विकृती असणारे आंदोलन सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आली व पत्रकार परिषद घेऊन या पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई यांनी स्वत:ची वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली भाजपा शिष्ठमंडळाने मा.पोलीस अधीक्षकसो यांना निवेदन देऊन संबंधित आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

 

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, काल शहरभरात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जी बॅनरबाजी झाली याची जबाबदारी आम आदमी पक्षाने स्वीकारली आहे. एखादी अतिरेकी संघटना ज्याप्रमाणे आपल्या कृत्याची कबुली देते अशीच पद्धत या संघटनेची आहे. अशा कुरापती करायला या संघटनांना पैसा कुठून येतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर अशा संघटनांना बळ कुठून मिळते, देशाबाहेरील विघातक शक्तींचा यामागे हात आहे का ? याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे असे नमूद केले.

          त्याचबरोबर या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीच्यावतीने पोलीस प्रशासनास सूचित करण्यात आले कि अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानांचा बदनामी करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही. तसेच यापुढेही त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अशीच राहिल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.

यावेळी सरचिटणीस दिलीप मैत्राणी, हेंमत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, संतोष भिवटे, नाना कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, सुनील चव्हाण, दिग्विजय कालेकर, रवींद्र मुतगी, रमेश दिवेकर, आशिष कपडेकर, विजय खाडे, गायत्री राऊत, निप्पणीकर, हर्षद कुंभोजकर, सुनील पाटील, सौरभ मालंडकर, पारस पलीचा, विजय दरवान, ओंकार गोसावी, प्रसाद मुजुमदार, रोहित कारंडे, सुनील पाटील, अमेय भालकर,विवेक वोरा, ह्रशंक हरळीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *