अनिल खंडागळे-प्रतिनिधी
रोहा :-रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र निलेश मधुकर वीस वर्षे भारतीय सेना दलात कार्यरत होते.आज तब्बल वीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत.अनेक तरूणांना सीमेवर देशाची सेवा करण्याची ईच्छा असते.त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात आणि सज्ज होतात देशसेवेच व्रत घेण्यासाठी,स्वतःच घरदार, सोडून सैनिक सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जातात.भारताच्या तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुरी शास्त्री यांनी याच सैनिकांबद्दल गौरोद्गार काढताना “जय जवान,जय किसान” असा नारा दिला होता.
एखादा तरुण जेव्हा देशसेवेसाठि भारतीय सैन्यदलात भरती होतो.त्यावेळेची हि घटना समस्त गावकरी,तालुका आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची असते.कारण आपल्या इथून एक सैनिक आता इथून पुढे भारतमातेच्या सेवेसाठी सीमेवर जाणार आहे हि भावनाच नागरिकांसाठी सन्मानाची असते.आज त्यापैकी एक असलेले निलेश मधुकर (पुई) हे जवान नुकतेच सेवानिवृत्त होऊन घरी परतले आहेत.भारतमातेची सेवा करुन आलेले जवान निलेश मधुकर यांच्यावर सर्व ठिकाणाहुन अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी युवा पत्रकार संघाच्या प्रतिनिधीशी बोलताना जवान निलेश मधुकर म्हणाले कि,भारताच्या सीमेवर जाऊन देशसेवा करण्याच स्वप्न अनेक तरुणांच असत.अनेक तरुण त्यासाठी प्रयत्न देखील करित असतात.काहीजण आपल्या प्रयत्नात यशस्वी होतात त्यातला मी एक.लहानपणपासुनच देशसेवा करण्याच व्रत घेतल होत ते सत्यात उतरल.आज तब्बल वीस वर्षानंतर देशाची सेवा करुन निवृत्त झालो याच समाधान वाटतय.