अनिल खंडागळे-प्रतिनिधी
रोहा :-अलिकडेच संपुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजेच “बैलगाडा शर्यत” अनेक बैलगाडा प्रेमीसाठी हि अनोखी पर्वणीच असते.राजकिय स्तरापासून ते अगदी हौशी प्रेमींकडुन “बैलगाडा शर्यत स्पर्धेच” आयोजन केल जात.या स्पर्धेत अनेक छकडेवाले सहभाग घेत असतात.
नुकतीच गुरूवारी ३० मार्च रोजी चणेरा-रोहा येथे पार पडलेल्या “बैलगाडा शर्यतीत” पिंगळसई गावचे सुपुत्र सनी जाधव,बैलगाडी हाकणारे मनोहर गवाले,हौशी मित्र शुभम जाधव यांनी आपल्या “वाघ्या आणि बाबु” या बैलजोडिच्या मदतीने फ्रि काॅटर गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावल. “जाधवांचा बैलगाडा,त्यांनी रोहात केलाय राडा..!” अशीच काहीशी हवा रोहा तालुक्यात केल्याच बोलल जात आहे.ग्रामीण भागात जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच बैलगाडा शर्यत.! पण काहि वर्षापुर्वी याच बैलगाडा शर्यतीवर शासनाने निर्बंध आणले होते त्यामुळे अनेक छकडेवाले आणि चाहते नाराज होते.पण नुकतीच शासनाने हि बंदी हटवली आणि जशी समुद्राला भरती यावी तशी छकडाप्रेमींच्या आनंदाला भरती आली.अनेक ठिकाणी या स्पर्धेच आयोजन केल जात आहे.यात स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा भरणा अधिक असतो.यात विजयी होणार्या स्पर्धकांचा यथोचित सन्मान केला जातो.स्पर्धा जिंकणारा शेतकरी आपल्या विजयाच सर्वस्वी श्रेय आपल्या बैलजोडिला देत असतो.