२०० कोटींची फसवणुक करणाऱ्या ग्रोबझ मधील संशयितांवर कारवाई सुरू…..!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 22 Second

विशेष वृत्त अजय शिंगे 

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात शाॅर्टकटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यापैकी एक प्रकरण म्हणजे ग्रोबझ मल्टीट्रेड कंपनी. गुंतवणुकीवर २०%. व्याज देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेले वर्षभर करवाई सुरू आहे. या प्रकरणी काल जिल्हापरिषदेतील सहायक लेखाधिकारी शिवाजी कोळी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील कोळी यांना अटक करण्यात आली आहे या फसवणुकीतील हे मुख्य आरोपी आहेत. 

   शिवाजी कोळी यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसह २०२१ मध्ये ग्रोबेझ कंपनी सह अन्य चार कंपन्या सुरू केल्या. ज्यादा परतावा देऊ असे आमिष दाखवून या सर्वांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी गेले वर्षभर कारवाई सुरू आहे. गुंतवलेले पैसे परत मिळणार नाही याची प्रचिती आल्यावर गेल्या वर्षी शाहूपुरी पोलिस स्टेशन मध्ये ग्रोबझ विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी २० संशयित आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील ९ जणांना अटक करण्यात आली होती. यातील काहींनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन घेतला आहे. 

या कंपनी मधून फसवणूक… 

  ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस, जी बी वेल्फेअर,ग्रोबझ मल्टीट्रेड, ग्रोबझ इंडिया अर्बन निधी 

कारवाई करण्यात आलेले आरोपी…

 विश्वास निवृत्ती कोळी, सौरभ सागर कोळी, वैशाली विश्वास कोळी, उज्वला शिवाजी कोळी, स्वप्नील शिवाजी कोळी, शिवाजी बापू कोळी, सोमनाथ मधुसूदन कोळी, सुशांत भानुदास मिरजकर, रवीसागर गणपतराव हाळवणकर, सचिन शांतीनाथ कदम, संदीप तुळशीदास सोनवणे रिटा संदीप सोनवणे, वासिम अब्दुलरशीद कारगीर, धनंजय कोंडीराम निकम, जयंत बळवंत कुळकर्णी महेंद्र दिनकर ऊत्तुरकर, प्रकाश तुकाराम पाटकर, राजकुमार दादू लोखंडे, संदीप अशोक पोळ, राजेंद्र रावसाहेब ढंगे या सर्वांवर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल…

सचिन कदम यांच्याकडून १८ लाख रुपये जप्त… 

सुशांत मिरजकर ९ लाख रुपये जप्त तसेच बँकेत असणारे १ लाख रुपये गोठवले…

संदीप सोनवणे – ६ लाख ९८ हजार रुपये जप्त….

रिटा सोनवणे १५ लाख रुपयांची कार तसेच बँकेत असणारे ६० हजार गोठवले

वासिम कारगीर ६ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने आणि ३ लाख रूपयांची रोकड जप्त….

प्रकाश पाटकर १ लाख रुपये तसेच ५५ हजारांचे दागिने जप्त…..

रविसागर हाळवणकर २ लाख रुपयांची बुलेट जप्त…

नक्की काय आहे ग्रोबझ प्रकरण….! 

  दामदुप्पट परतावा देऊ असे आमिष दाखवून शिवाजी कोळी यांच्यासह अन्य १८ साथीदारांनी ग्रोबझ नावाची कंपनी सुरू केली. या मध्ये गुंतवणूक करा आणि १५-२० टक्क्यांहून अधिक व्याज देऊ असे सांगून करोडो रुपयांची फसवणूक केली. सुरुवातीला काही लोकांना त्यांनी चांगला व्याजदर देऊन पैसे दिले. त्यामूळे लोकांचा विश्वास बसला. तसेच या मध्ये शासकीय अधिकारी असल्याने विश्वास ठेवला गेला. एवढे मोठे शासकीय अधिकारी आहेत इथे आपली फसवणुक होणार नाही हा गैरसमज त्यांना झाला आणि आता सर्वजण अडचणीत आले. करोडो रुपयांची गुंतवणूक झाल्यावर ते सगळे पैसे घेऊन ह्या सर्वांनी हजारो लोकांची फसवणुक केली.या प्रकरणी गेले वर्षभर पोलिसांकडून करवाई केली जात आहे.

जामीन वर बाहेर आलेले आरोपी…?

 अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आलेले काही आरोपी वेगळ्या नावाने कंपनी सूरू करून काम करु लागले आहेत. पुन्हा अशी फसवणुक होऊ शकते त्यामूळे लोकांनी जरा सतर्क राहावे.

विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार घेऊन समाजात खराब झालेली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या पुरस्कार च्या पोस्ट व्हायरल देखील होत आहेत.

  कारवाई झाली पुढे काय..?

 २० पैकी ९ जणांना अटक करण्यात आले काहीजण अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आले. मुख्य आरोपींना कालच अटक झाली आता पुढे काय असा प्रश्न लोकांमधून येत आहे . या प्रकरणात जे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांनी असे सांगितले कीआरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपींची मालमत्ता शोधून त्यावर जप्तीची कारवाई केली जात आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *