महापालिकेच्यावतीने श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी….!

कोल्हापूर :- श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने नविन राजवाडा येथील श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महाराणी साहेब सौ. श्रीमंत याज्ञसेनीराजे छत्रपती, युवराज्ञी महाराज सौ, श्रीमंत संयसोगीताराजे छत्रपती, सौ. श्रीमंत मधुरीमाराजे छत्रपती, कुमार यशराजराजे छत्रपती, कुमारी यशस्विनीराजे छत्रपती, शहरअभियंता हर्षजित घाडगे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, ॲड. राजेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, माणिक मंडलिक, अमर सासणे, नाना जाधव, दीपक घोडके, मनोज जाधव, नंदकुमार बामणे, माजी सैनिक प्रसन्न मोहिते, राजेंद्र दळवी, पंढरीनाथ माने, न्यु पॅलेस सोसायटी, रमणमळा पत संस्था, मालोजीराजे पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *