चांगल्या चाललेल्या संस्था मोडून खाणं हाच बंटी पाटलांचा गुणधर्म – खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने धडाक्यात सुरुवात केली आहे. काल वडणगे येथे झालेल्या प्रचार शुभारंभानंतर आज करवीर तालुक्यातील वळीवडे येथे सत्तारूढ छत्रपती राजर्षी राजर्षी शाहू सहकार आघाडीची सभा झाली. या सभेला वळीवडे आणि चिंचवाड गावातील सभासदांनी मोठी गर्दी केली होती. 

यावेळी बोलताना किरण घाटगे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घालणारे विरोधक आज उजळ माथ्याने मत मागायला येत आहेत त्यांना लाज कशी वाटत नाही? असा सवाल किरण घाटगे यांनी विचारला.

Advertisements

तानाजी पाटील यांनीही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सभासद रद्द करून राजाराम कारखाना घ्यायचा विरोधकांचा डाव आम्ही हाणून पाडला आहे. सदैव सुडाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनी कोल्हापूरचा बिहार करून टाकला आहे. पण आता तुमचे १०० अपराध भरले आहेत, आता राजारामचे सभासद तुम्हाला धडा शिकवतील अशा शब्दात तानाजी पाटील यांनी विरोधकांना फटकारले.

खासदार धनंजय महाडिक यानी बोलताना २५ तारखेला विरोधकांची पोटदुखी कायमची थांबेल असा टोला लगावला. मनोरुग्ण पाटलांनी बिनबुडाचे आरोप थांबवावेत. इतर कारखान्यांसोबत तुलना करण्याऐवजी डी.वाय. सोबत राजाराम ची तुम्ही तुलना का करत नाही असा सवाल धनंजय महाडिक यांनी विरोधकांना केला.

तुमच्यात हिम्मत असती तर तुम्ही काल बिंदू चौकात आला असता. पुतण्याला पुढे करून तुम्ही लपून बसला. तोही वेळेत आला नाही. ज्याने आयुष्यात कधी जोर-बैठका मारल्या नाहीत. तो काल दंड थोपटून दाखवत होता हाच मोठा विनोद असल्याचंही महाडिक यांनी सांगितले.

यावेळी भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, माजी सरपंच अनिल पंढरे, संजय चौगुले, ग्रामपंचायत सदस्य मेघा मोहिते, अनिता पाटील ,राधिका मोरे, स्वाती इंगवले, वैजनाथ गुरव , तानाजी पाटील, दिलीप पाटील, दिलीप उलपे, नारायण चव्हाण, किरण घाटगे, धनपाल पाटील, माजी सरपंच सुदर्शन उपाध्ये, प्रकाश पाटील, शंकर शिपेकर, बाबासाहेब पाटील, बाबासो माणगावे , उदय पाटील, महेश मोरे, विक्रम मोहिते यांच्यासह वळीवडे , चिंचवाड गावातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *