महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 30 Second

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोना बाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली

कसबा बावडा येथे राहणारी ही महिला २० व २१ मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ ते २८ मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. २८ मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती. तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे ३० मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी ३१ मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. ३ एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *