Share Now
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीही स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तूनिष्ठ बातम्या व माहीती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील यांच्यावतीने सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सांगली सेंटरवर भेट देऊन पाटिल यांनी सर्व वृत्तपत्र विक्रेते, वितरक, लाईनबाॅय यांना सॅनिटायझर प्रदान केले. यावेळी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे पदाधिकारी, शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते, सर्व वृत्तपत्रांचे वितरण व्यवस्थापक, वितरण प्रतिनिधी उपस्थित होते. समस्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने विशाल दादा पाटील यांचे आभार मानण्यात आले.
Share Now