आम्ही सहकाराच्या बाजूने होतो सहकाराच्या बाजूनेच राहणार – राहुल आवाडे

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचारसभा, रुई येथे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली यावेळी बोलतांना मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे म्हणाले की आम्ही सहकारतील लोकं आहोत आणि सहकाराच्या बाजूनेच राहणार आहे. सभासदांच्या प्रचंड प्रतिसादात झालेल्या या सभेत छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीत आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. जिल्ह्यातील सहकार टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण आघाडीच्या पाठीशी आहोत, ही खात्री यावेळी सभासदांनी दिली.

यावेळी कृष्णात अपराध, सरपंच सौ.शकीला कोनुरे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, हातकंणगले तालुका पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील, उपसरपंच सौ. अश्विनी पोवार, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मिरे, व्हा.चेअरमन राजाराम बेनाडे, कबनूरचे माजी उपसरपंच सुधीर पाटील, गोगा बाणदार,हुपरे सर, राजाराम झपाटे सर, भाऊसो फासके, जयसिंग शिंदे, महादेव अपराध, जहांगीर मुजावर, अनिल जाधव, सुभाष चौगुले, पद्मजा हेरवाडे,बबन काश्मीरे, सुरेश पाटील, किरण पाटील, काशिनाथ पुजारी, जिनगोंडा पाटील, अरुण पाटील, सदस्य सुधीर लिगाडे, जिनेंद्र ऐतवाडे, जंबुकुमार देसाई, प्रकाश पाटील, आनंदा तोडकर, राजाभाऊ देसाई, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *