Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
कोल्हापुर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हालोंडी, मौजे वडगांव आणि हेर्ले येथे शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या भेटी घेतल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की सहकार संपवणारेच आता सहकार वाचवायच्या गोष्टी करत आहेत. पण कोणाला निवडायचे हे आपल्याला माहिती आहे. सहकार जपणाऱ्या सत्तारूढ आघाडीलाच पुन्हा निवडून द्यायचे आहे.
कपबशी’ चिन्हाची निवड करून ‘ राजर्षी शाहू सहकार आघाडी’लाच बहुमताने विजयी करा. सहकार जपण्यासाठीचा आपला हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन आहे.यावेळी सर्व गावातील सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now