कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : प्रभाग क्रमांक १४ चे विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण यांनी आपल्या भागातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी दक्षता घेत . कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेप्रमाणे स्वच्छतेची, नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता आटोकाट प्रयत्न करीत आहेत
नगरसेवक यांनी देशात लॉक डाऊन असल्याने भागातील नागरिकांना घरातून बाहेर पडू नये,घरातच राहावे आपल्या आरोग्याची दक्षता घ्यावे, रोडवर गर्दी करू नये, असे आव्हान करत आपल्या भागातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांच्या कडून स्वतःच्या पैशाने दोन टेम्पो भाजी फ्लॉवर खरेदी करून, सोशल डिस्कशन पाळत काही मोजकेच कार्यकर्ते घेऊन,
नगरसेवक चव्हाण यांनी सुतार वाडा,नंदनवन पार्क, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी व्यापार पेठ,शिंगे चाळ,व्हीनस कॉर्नर परिसर,बसंत बहार टॉकीज परिसर, महावीर गार्डन परिसर, व इतर संपूर्ण भागात पायी फिरून भाजी फ्लावर याचे वाटप केले. भागातील नागरिकांना नगरसेवक राहुल चव्हाण यांचे महापुरात देखील मोलाचे सहकार्य लाभले . आत्ताच्या कठीण काळात देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून भागात औषध फवारणी करून स्वच्छता करून, आज भाजीपाल्याचे वाटप करत आपल्या भागातील नागरिकांची दक्षता घेत असल्याची कृतज्ञता व्यक्त करून भागातील नागरीक कौतुक करीत आहेत,
या उपक्रमामध्ये मोहन मोरबाळे, संजय शिंगे, राजू लोहार स्नेहा शिंगे , संजय संकपाळ ,अजित लोहार ,संजय परब व भागातील नागरिक कार्यकर्ते सहभाग घेतले
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण यांचे भागातील नागरिकांकडून कौतुक

Read Time:2 Minute, 31 Second
CogratulationMr.Rahul Chavan.Keep it up.We all are woth you.