शाहू फाउडेशन, तडाका तालीम, कोल्हापूर पोलीस व शिवतेज तरुण मंडळ पुढील फेरीत

कोल्हापूर : येथील लाईन बझार हॉकी मैदानावर जिल्ह्याचे नेते व गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य लाईन बझार व पोलीस लाईन हॉकीप्रेमी च्या वतीने सुरु असलेल्या आजच्या दिवसातील लढतीत शाहू फाउडेशन, तडाका तालीम, कोल्हापूर पोलीस व शिवतेज तरुण मंडळ यांनी आपआपल्या प्रतिस्पर्धेकांवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

आजच्या सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात शाहू फाउडेशन संघाने फोर्ज क्लब संघाचा ६-० गोलनी सहज पराभव केला. शाहुकडून वैभव पाटील ने २, अनिकेत चौगुले ने २ व ऋतुराज पाटील व यश पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करत शाहू संघाला सामना जिंकून दिला.

Advertisements

दुसऱ्या झालेल्या अतितटीच्या लढतीत तडाका तालीम संघाने छावा मित्र मंडळाचा सडनडेथवर १-० गोलनी पराभव केला.

सामन्याच्या पूर्वाधार्थ छावा च्या विजय पाटील ने ५ व्या मिनीटास पहिला गोल केला. त्यानंतर २२ मिनिटास तडाका च्या मंगेश खोत ने मैदानी गोल करत सामना १-१ बरोबरीत आणला. उत्तराधार्त पुन्हा छावा च्या विजय पाटील ने वैयक्तिक २ रा गोल केला, मात्र ४५ व्या मिनिटास तडाका च्या ओंकार निकम ने गोल करत सामना पुन्हा २-२ गोलबरोबरीत आणला. सामन्याची वेळ संपल्याने ८ सेकंद स्ट्रोक चा वापर करण्यात आला. यामध्ये ही दोन्ही संघाकडून ४-४ गोलची बरोबरी झाल्याने सडनडेथ चा वापर करण्यात आला. यामध्ये तडाका च्या ओंकार निकम याने केलेल्या गोलवर तडाका संघास विजय मिळाला.

दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने संयुक्त लाईन बझार संघाचा तब्ब्ल ९-१ गोलनी विजय मिळवला. कोल्हापूर पोलीस संघाकडून चिराग माने ने ३, सत्यजित सावंत ने २, दिपक मालाई ने २, तर अमित जाधव, अमित शिपुरे प्रत्येकी एक गोल करत संघास विजय मिळवून दिला. संयुक्त लाईन बझार कडून मुजमिल खान याने एकमात्र गोल केला.

चौथ्या आणि आजच्या शेवटच्या सामन्यात शिवतेज तरुण मंडळाने पोलीस बॉइज संघाचा ६-२ गोलनी पराभव केला. शिवतेज संघाकडून नदीम ने ३ व अकिब, रियाज व अथर्व यांनी प्रत्येकी एक गोल केला तर पोलीस बॉइज कडून संकेत संकपाळ व सिद्धांत पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याची वेळ संपल्याने हा सामना शिवतेज संघाने ६-२ गोलनी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.

सामन्यात पंच सागर जाधव, अनिकेत मोरे, दिपक पाटील, मनोज इनानी, ओंकार भांडवले, विजय जाधव, राहुल गावडे, संजय डोंगरे, दत्ता पाटील, चेतन जाधव, निसार म्हालदार यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सागर यवलुजे, संतोष पोवार, धनाजी तोरसकर, ताहीर शेख अधिक परिश्रम घेत आहेत.

 

मंगळवार दि ०९/०५/२०२३ रोजीचे होणारे सामने

पदमा पथक 

देवगिरी फायटर्स (वडगाव)

सकाळी ७.३० वा.

तडाका तालीम 

एस.डी. पाटील ट्रस्ट (इस्लामपूर)

सकाळी ९ वा.

महाराष्ट्र क्रीडा मंडळ

मुंबई पोलीस मुंबई 

दुपारी ४ वा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *