कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : जेष्ठ नागरिक श्रीमती विजयमाला पांडुरंग वरुटे या राजारामपुरी १२ वी गल्लीतील जेष्ठ व्यक्तींनी पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्याकरिता मदतीचा हात पुढे केला.
गेल्या १ एप्रिलपासून लॉक डाउन संपू पर्यंत रोज सकाळी ९ वाजता सर्व पोलीस ,आरोग्य कर्मचारी ,यांना नाष्टा देण्याची व्यवस्था केली आहे. याचे वाटप धनंजय महाडिक युवा शक्ती चे शहर अध्यक्ष रहीम सनदी यांच्या नियोजना खाली रोज सकाळी युवा शक्ती चे कार्यकर्त्यांच्या वतीने वाटप केले जाते हा उपक्रम सलग लॉक डाऊन च्या काळापर्यंत चालू राहणार आहे .
कावळा नाका ,दाभोलकर कॉर्नर ,राजारामपुरी चौक, एस. टी स्टँड, शाहूपुरी,टेबलाई नाका ,सायबर चौक व शहराच्या सर्व या सर्व ठिकाणी पोलीस, आरोग्य कर्मचारी व रस्त्यावर भुकेने व्यकूळ होऊन फिरणाऱ्या बेघर व्यक्तींना चहा नाष्टा वाटप करण्यात आलेे . यावेळी युवाशक्तीचे कार्यकर्ते व रहीम सनदी,महंमद सनदी,मुबीन मुजावर,निलेश कोळेकर ,सरफराज शेख,शेखर गोने,सोहम खताते, छाया गोने ,सावित्री कांबळे हे उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्या आव्हानाला प्रतिसाद

Read Time:1 Minute, 44 Second