मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने पोलिसांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली शहरामध्ये पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहे . अशावेळी त्यांना सॅनिटायजरची जास्त गरज असते म्हणून आज मदन भाऊ पाटील युवा मंचतर्फे सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.

मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी सांगली सिटी पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस स्टेशन, ट्राफिक ऑफिस, ग्रामीण पोलीस स्टेशन ,संजय नगर पोलीस स्टेशन या सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सॅनिटायजरचे वाटप करून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी सोनिया होळकर पाटील मा, मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, संजय पवार, अजित जाधव,प्रवीण निकम, अवधूत गवळी, संजय कांबळे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *