Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीतील विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या जवळजवळ १७५ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निकम व सांगली शहर पोलीस निरीक्षक सिंदकर तसेच विश्रामबाग शहर पोलीस निरीक्षक तनपुरे यांनी विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या दुचाकीस्वारास पकडून त्यांच्यावर कारवाई करून गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
विनाकारण फिरताना दिसल्यास त्या गाड्या जप्त करण्यात येईल तरी नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल निकम यांनी केले आहे
Share Now