Share Now
Read Time:1 Minute, 19 Second
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री छत्रपती शाहू मिलमध्ये गुरुवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देणारा सुमित साळुंखे दिग्दर्शित ‘राजा रयतेचा’ हा नृत्य, नाट्य, संगीतमय कलाविष्कार प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
या प्रयोगात ३५ कलाकार सहभागी असून शिवजन्म सोहळा, पावनखिंड रणसंग्राम, शिवराज्याभिषेक सोहळा आदी प्रसंगांचे सादरीकरण होणार आहे. तसेच हे कलाकार राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कलेतून मानवंदना देणार आहेत. यावेळी हे कलाकार विविध लोककला सादर करणार असून स्टार सिंगर श्रावणी महाजन या गीते सादर होणार आहेत. विनामूल्य असणाऱ्या या प्रयोगाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
Share Now