रोहा पाटबंधारे विभागानी कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरु नये…!

दिपक भगत-रोहा तालुका प्रतिनीधी

रोहा : काही महिण्यांपासुन कालव्याला पाणी याव यासाठी कालवा दुरूस्ती मोहीम पाटबंधारे विभागाने हाती घेतलेली आहे.अस असल तरी काही ठिकाणी धीम्या गतीने काम चालु असल्याच चित्र दिसत आहे.असाच काहीसा प्रसंग विष्णुनगर ते बारसोली या ठिकाणी नागरिकांना अनुभवायला मिळतो आहे.कालव्याच पाणी लवकरात लवकर आल पाहिजे शेतकरी व ईतर घटकांना पाणी मिळाल पाहिजे हि जनभावना मान्य केली तरी विष्णुनगर ते बारसोली या रस्त्याने प्रवास करणार्या नागरिकांची गैरसोय पाटबंधारे विभागानी का करावी? असा प्रश्न जनमाणासातुन निर्माण होत आहे.

Advertisements

     आज वैयक्तिक कामानिमित्त किंवा कंपणीत ये जा करणार्या रोजंदार लोकांचा या रस्त्याने मोठ्याप्रमाणात वावर असतो.यात प्रामुख्याने सुदर्शन कंपणीत कामावर तीनही शिफ्टमध्ये काम करणार्यासाठी तेथुन प्रवास करणार्या मुली किंवा या ना त्या कारणाने तेथून जाणार्या महिला असतील.रस्त्यावर टाकलेल्या या भरावामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी करण्यास व वाहतूक करण्यास अडचण निर्माण होत आहे.रस्त्यावर टाकलेल्या भरावामुळे बाजूने प्रवास करावा लागतो आहे.परंतु माती आणि पाणी यामुळे चिखलांनी खड्डेमय झालेल्या रस्तामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे.ऐन पवसाळ्यात हि परिस्थिती आणखी चिघलण्याची शक्यता नाकाराता येत नाहि. त्यामुळे रोहा पाटबंधारे विभागानी कालवा दुरूस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठिस धरु नये.धोकादायक स्थितीतुन मार्ग काढुन जीवाची कसरत करुन नागरिकांना तेथुन प्रवास करावा लागतो आहे.तरि पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर रस्त्यावर टाकलेल्या भराव हटवून नागरिकांच्या हक्काचा असलेला प्रवासी मार्ग मोकळा करुन अशा धोकादायक स्थितीमुळे निर्माण होणारे अपघात टाळावेत अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *