खा.एस.डी.पाटील ट्रस्ट (इस्लामपूर) व महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर) अंतिम फेरीत दाखल ….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 59 Second

कोल्हापूर : येथील लाईन बझार हॉकी मैदानावर जिल्ह्याचे नेते व गटनेते मा. गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य लाईन बझार व पोलीस लाईन हॉकीप्रेमी च्या वतीने सुरु असलेल्या आजच्या उपांत्य फेरीतील झालेल्या लढतीत खा.एस.डी.पाटील ट्रस्ट इस्लामपूर व महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर यांनी आपआपल्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार दि.१३ रोजी दुपारी ४ वा. लाईन बझार हॉकी मैदानावर खेळविण्यात असून या सामन्यानंतर या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा बक्षीस समारंभ मा.संभाजीराजे छत्रपती, मा. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील , आमदार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

आजच्या सकाळच्या पहिल्या चूरशीच्या सामन्यात खा.एस.डी.पाटील ट्रस्ट इस्लामपूर संघाने मुंबई पोर्ट, मुंबई संघाचा १-० गोलनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. 

सामन्याच्या पूर्वाधार्थ २४ व्या मिनिटास एस.डी.पाटील इस्लामपूर संघास मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर प्रथमेश पाटील ने उत्कृष्ट गोल करत संघास एक गोलची आघाडी मिळवून दिली.

उत्तराधार्त दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु निर्धारित वेळेत दोन्ही संघाना गोल करता आला नसल्याने व सामन्याची शिल्लक वेळ संपल्याने हा सामना खा.एस.डी.पाटील ट्रस्ट इस्लामपूर संघाने १-० गोलनी जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसरा उपांत्य सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर) वि. निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन (इस्लामपूर) या दोन संघात चूरशीचा झाला.

सामन्याच्या पूर्वाधार्त महाराष्ट्र क्रीडा मंडळाला दोन तर निशिकांत स्पोर्ट्स संघाला दोन पेनल्ट्री कॉर्नर मिळाले परंतु दोन्ही ही संघाला एकही गोल करता आला नाही. सामन्याच्या उत्तराधार्त गोल करण्यासाठी दोन्ही संघाकडून प्रयत्न सुरु होते परंतु, यामध्ये ही दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही त्यामुळे हा सामना रोमांचंकारी झाला. सामन्यातील वेळ संपल्याने ८ सेकंद स्ट्रोक चा वापर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र कडून पराग पाटील, तन्मय जाधव, स्वराज चौगुले व रोहित रेडेकर यांनी तर निशिकांत स्पोर्ट्स कडून मल्हारी चव्हाण, धनराज जाधव, विठ्ठल तेली व शशांक कबुरे यांनी प्रत्येकी एक गोल करत हा सामना पुन्हा ४-४ गोलबरोबरीत आला. त्यानंतर सडनडेथ चा वापर करण्यात आला. यामध्ये निशिकांत स्पोर्ट्स संघातील धनराज जाधव याला गोल करण्यात यश आले तर, विठ्ठल तेली व मल्हारी चव्हाण यांचा गोल न झाल्याने व महाराष्ट्र कडून रोहित रेडेकर व स्वराज चौगुले यांचा गोल झाल्याने हा सामना महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर संघाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.सामन्यात पंच अनिकेत मोरे, राहुल गावडे, दीपक मालाई, दिपक पाटील मनोज इनानी यांनी काम पाहिले.

अंतिम सामना शनिवार दिनांक १३/०५/२०२३ रोजी दुपारी ४ वाजता 

महाराष्ट्र क्रीडा मंडळ (कोल्हापूर)

वि.

खा.एस.डी.पाटील ट्रस्ट (इस्लामपूर)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *