कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियानाची आज उत्साहात सुरवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, हेंमत आराध्ये, दिलीप मैत्राणी, अजित ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.आज जवळपास ४७ इतक्या व्यक्ती, संघटनांनी याठिकाणी आपले निवेदन सादर केले.
यामध्ये महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध विभागातील प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांनी या सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना दिलासा देणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांचे निवेदन देऊन आपल्या कामाबद्दल प्रशासनाच्या कामाबद्दल कारणे देण्याचा, टाळाटाळ करण्याचा पाढा सर्वांनी वाचला. निर्णय प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाने अनेक नागरिक यावेळी त्रस्त दिसले. यावेळी अनेक नागरिकांनी भाजपा म्हणून समनव्य मित्र म्हणून आपण या कामी लक्ष देऊन आमची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून द्यावीत अशी इच्छा व्यक्त केली.
नागरिकांच्या या मागण्यांचा, त्यांच्या समस्यांचा सकारात्मक विचार करून खाते निहाय भाजपा समनव्यक निवडून लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.आजच्या या उपक्रमांनंतर आगामी काळात नागरिकांनी आपले प्रश्न दर मंगळवारी ४ ते ६ या वेळेत अर्जाद्वारे पक्षाच्या बिंदू चौक कार्यालयात लेखी स्वरुपात द्यायचे आहेत.
यावेळी अमल महाडिक, शैलेश चव्हाण, माणिक पाटील चुयेकर, अजिंक्य चव्हाण, विजय खाडे, अजित ठाणेकर, शेखर वडणगेकर, रवींद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, गिरीश साळोखे, नरेंद्र पाटील, रमेश दिवेकर, अभय तेंडुलकर, अभय वंटे, बंडा साळोखे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, बाबा इंदुलकर, गुरुदत्त म्हाडगूत, इकबाल हकीम, दीपक काटकर, आजम जमादार, किशोरी स्वामी, प्रमोदीनि हार्डीकर, छाया साळोखे, सुषमा गर्दे, छाया ननावरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.