कर्नाटकात भाजपला धक्का….?

बेळगाव : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे दिसून येत आहे तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

आजचा दिवस हा कर्नाटक राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. मत मोजणीला सुरुवात झाली आहे आणि जवळपास २०० जागांचे कल हे हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी टक्कर ही पाहायला मिळत आहे. काँग्रेस ११५ आणि भाजप ७५ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. कल सातत्यानं बदलत आहेत. सध्या भाजपचे ८ कॅबिनेट मंत्री हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८.३८ च्या सुमारास ट्रेंडमध्ये काँग्रेसने ११३ जागांवर आघाडी घेतली होती. २२४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असेल. मात्र, काँग्रेसला आपली आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही आणि पुन्हा एकदा १०० च्या खाली आली.

Advertisements

 

सध्याच्या घडीच्या काही महत्वाचे मुद्दे –

आकडे सातत्याने बदलतात

कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत, ११३ जागांवर आघाडी

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर

भाजपची ,मोठी पिछाडी

भाजपचे ८ कॅबिनेट मंत्री हे पिछाडीवर

एकीकरण समितीचे उमेदवार पिछाडीवर

जेडीयुचे नेते व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर

दोन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पिछाडीवर

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *