साधना नायट्रो केम लि.रोहा कंपनीच्या गलथान कारभाराची प्रशासनाने घेतली गंभीर दखल….!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 40 Second

दिपक भगत रोहा प्रतिनिधी

रायगड रोहा :- औद्योगिक वसाहत म्हटली कि नागरिकांच्या  आरोग्य बाबतीत विविध प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या ह्या आवासुन उभ्याच असतात.

परंतु सर्वसामान्य नागरिकांना या समस्येतुन किती दिलासा मिळतो हे मात्र सांगता येणार नाहि.सामाजातील काही लोक हे याबाबत तक्रार करतात आणि विषय सोडुन देतात.पण समाजात अशी काही लोक असतात जी सातत्याने या तक्रारीचा पाठपुरावा करीत असतात.

असाच काहीसा प्रकार औद्योगिक वसाहत धाटाव विभागात पहावायास मिळालेला आहे. साधना कंपनीच्या आवारातुन उघड्यावर रासायनिक पाणी सोडण्याचा प्रकार काही दिवसापूर्वी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सतोष भोकटे यांनी स्थानिक कंपनी प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल होत. परंतु ते रासायनिक पाणी आमच नाही अशा शब्दात जबाबदारी झटकण्याच काम स्थानिक कंपणी प्रशासकांनी केल. आणि अवघ्या काहि दिवसांत रासायनिक पाणी असलेल्या जागेवर मातीच्या ट्रकने भराव टाकुन आपणच काहीतरी चूक केलेली आहे हे आपल्या कृतीतुन सिद्ध करूनही दाखवल.

परंतु हे काम करित असताना ग्रामपंचायत कार्यालायाची आवश्यक ती कोणतीच परवानगी कंपनी प्रशासनाने घेतलेली नसल्याची बाब संतोष भोकटे यांच्या निदर्शनास आली. ग्रामपंचायत कार्यालयातून प्राप्त झालेल्या पत्रात साधना कंपनीच्या स्थानिक प्रशासकीय अधिकारी बेडेकर यांच्या वागणुकिबाबत खेद व्यक्त केल्याच दिसून आल. हे पत्रक हाती येताच संतोष भोकटे यांनी उपविभागीय कार्यालयात धाव घेतली.

          संतोष भोकटे यांच्या तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी आज रोजी घटनास्थळी दाखल झाले.यावेळी बोलताना “उप विभागीय अधिकार्यांनी साधना नायट्रो केम कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात खेद व्यक्त केला. तसेच याबाबतची तक्रार वरिष्ठ पातळीवर करुन संबधित कंपनी प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याच सांगितले.”

          यावेळी संतोष भोकटे म्हणाले कि,”धाटाव येथे आणखी औद्योगिक कंपण्या वसाव्यात, त्या वाढाव्यात त्यातुन स्थानिकांना रोजगार मिळावा हि आमची ईच्छा आहे परंतु रोजगाराच्या नावाखाली शासनाच्या नियमांच उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी  नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होईल असे रासायनिक पाणी सोडणाऱ्या मग्रुर कंपण्यांना प्रशासनाची चपराक हि मिळायलाच हवी.”

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *