Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांना व जनावरांना याचा फटका बसत आहे.
त्यांना खाण्यासाठी काही मिळत नसल्यामुळे या भटक्या कुत्र्यांना जीवदान मिळावे या हेतूने येथील जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रोच्या वतीने भटक्या कुत्र्यांना भाकरी, चपाती, बिस्किटे असे अन्न देण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
त्यानुसार दररोज सकाळी साळोखेनगर, हाडको कॉलनी परिसरातील भटक्या कुत्र्यांना जीवदान मिळावे या उदात्त हेतुने भाकरी,चपाती व बिस्किटे खाण्यासाठी दिली जात आहेत. हा कार्यक्रम गेले अनेक दिवस राबविला जात असून यामध्ये मेट्रोचे माजी अध्यक्ष श्री शिवाजीराव यादव,आप्पासाहेब पाटील, बाळासाहेब सोनुले, मेहबूब शेख, बबन पाटील, प्रा. मोहन गावडे,साईराज तिवले, अथर्व तिवले, सुनील बराले आदी यामध्ये सहभाग घेत आहेत.
Share Now