मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझीटिव्ह

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 32 Second

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : 
दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पाॕझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली.
हा तरुण दिल्ली येथून १४ मार्चरोजी निघून १६ ला कोल्हापुरात पोहोचला येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि १८ मार्चला परतला.
पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १ एप्रिलला प्रशासनामार्फत त्याला दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वॕब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पाॕझीटिव्ह आला. त्याला  आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *