रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा डाय या कंपनीच्या गोडाऊनला लागली भीषण आग…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 38 Second

 

 

(अमर पवार-रोहा प्रतिनिधी):-रोहा येथील धाटाव एमआयडीसी पुन्हा चर्चेत.एमआयडीसी मध्ये रोहा डाय या कंपनीमध्ये दुपारी १:०० वा.च्या सुमारास गोडाऊन ला भीषण आग लागली.आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.प्राथमिक माहितनुसार गोडाऊन मध्ये कोळसा तसेच केमिकल रॉ मटेरियल ठेवले होते. कोळशाने पेट घेतल्याने आग लागल्याचे समजले.आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी कंपनीतून बाहेर पळायला गर्दी केली.आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की आजूबाजूच्या कंपण्या सुधा काही वेळा करिता खाली कराव्या लागल्या.आजूबाजूचे रस्ते धुरानी झाकून गेले होते. आगीचे लोळ पाहून लोकांची धावपळ झाली, धुराचे साम्राज्य पसरले आगीची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले. एमआयडीसी तील फायर ब्रिगेड चे कर्मचारी तत्काळ तेथे पोहचले आणि प्राणाची पर्वा न करता त्यांनी आग विजवण्याचे काम चालू केले. आग विजवत असता गोडाऊन मध्ये स्फोटाचे आवाज येत होते,आग विजवताना फायर ब्रिगेडच्या दोन कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण दुखापत झाली. तसेच कंपनीतील एका कामगार गोडाऊन मध्ये अडकला असता त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार करण्यासाठी पाठवुन देण्यात आले आहे. एमआयडीसी तील अपघाताची बातमी समजताच स्थानिक आमदार श्री.अनिकेत तटकरे ,तसेच पनवेलचे आमदार श्री.प्रशांत ठाकूर यांनी अपघात स्थळी पाहणी करून प्रशासनाला तातडीने सहकार्य करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने तसेच शेजारील ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्य बद्दल कंपनी प्रशासनाने आभार मानले तसेच आग कशामुळे लागली याचं कारण शोधून ते पुन्हा होणार नाही या साठी लागणाऱ्या उपाययोजना करू असे कंपनी प्रशासनाने सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *