“मा. अनिल खंडागळे” यांच्या वाढदिवसा निमित्त मौजे प्राथमिक शाळा मुठवली खुर्द रोहा येथील शाळेत शैक्षणिक साहित्यांच वाटप.

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 1 Second

 

(रोहा प्रतिनिधी):-आजच्या धावपळीच्या युगात कोणासाठी कोणाकडे वेळ नाहि.जो तो आपापली जीवनशैली उत्तमरित्या कशी जगता येईल या विचारात असताना सामाजातील काहि मोजकेच तरुण सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत असतात. आजचे तरुण हे बर्याच क्षेत्रात नाव कमावते झालेत.मोठे पदस्थ झाले असे असले तरी काहि तरूणांनी मात्र सामाजिक जाण अजूनही जोपासलेली आहे.आपल्या कमाईतला काहीसा हिस्सा समाजासाठी देण्याची वृत्ती अंगी ठेवत आज बरेच तरूण प्राथमिक शाळेत भेटी देवुन यथाशक्ती काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यातलेच एक उल्लेखनीय नाव म्हणजे “अनिल खंडगळे”.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे,युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य रोहा तालुका उपाध्यक्ष,तसेच प्रशासकीय कामे करण्यात तेवढेच तत्पर असणारे अनिल खंडागळे.आपल्या मोकळ्या वेळेत प्रशासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याच काम ते नेटाने करीत असतात.
समाज माझ्यासाठी काय करेल यापेक्षा मला या समाजासाठी काहीतरी करता आल पाहिजे या उद्धात्त हेतूने प्रामाणिकपणे काम करीत असताना समाजिक बांधिलकी जोपासत आज आपल्या वाढदिवसानिमित्त मौजे रा.जि.प.प्राथमिक शाळा मुठवली खुर्द रोहा येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याच वाटप करुन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित प्राथमिक शाळा मुठवली खुर्द मुख्याध्यापिका सौ.वेधे मॅडम,अंगणवाडि शिक्षिका,शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला पदाधिकारी,तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी श्री.अमर पवार,श्री.रघुनाथ मोरे,श्री.राजेश कासारे उपस्थित होते.याप्रसंगी शाळेकडुन अनिल खंडागळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात अाल्या. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या या तरुण नेतृत्वास “रायगड स्वभिमान दैनिकातर्फे” वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *