युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी कोल्हापुरातील पत्रकार रवाना

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी :राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या नियोजनामुळे युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या वतीने दिल्ली येथे अभ्यास दौरा काढण्यात आला आहे.

संसदेमध्ये होतअसलेल्या पावसाळी अधिवेशनास भेट देण्यासाठी तसेच संसदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातून विविध माध्यमातील पत्रकार रवाना झाले.

Advertisements

यावेळी पृथ्वीराजबाबा महाडिक आणि आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी दौऱ्यासाठी निघालेल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

संसदरत्न खासदार धनंजय महाडिक यांनी वेळोवेळी होणाऱ्या प्रत्येक अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मांडले आहेत. तसेच ते मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा देखील केला आहे. याच सर्वांची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातून हा पत्रकार अभ्यास दौरा काढण्यात आलेला आहे.

यावेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य कार्याध्यक्ष विवेक पोर्लेकर, विजय पोवार, श्रद्धा जोगळेकर, शुभांगी तावरे, अक्षय थोरवत, राज्य सरचिटणीस अजय शिंगे, राज्य संघटक नियाज जमादार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शरद माळी, राज्य सदस्या अक्षता नाईक, पुष्पा पाटील, कोल्हापूर शहर अध्यक्ष रविंद्र कांबळे, राज्य सदस्य उदय पाटील, अपर्णा पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *